Home नाशिक नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

44
0

आशाताई बच्छाव

1000535312.jpg

नाशकात सिटीलिंक बसखाली चिरडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी सतीश सावंत 

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या सिटीलिंक बससेवा आता पुन्हा वादात सापडली असून, नशिक शहरातील नाशिकरोड परिसरात सिटीलिंक बसच्या धडकेत एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वीही सिटीलिंक बस अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातात पाच वर्षीय चिमुकलीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, हा ड्रंक अँड ड्राईव्हचा प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं..?

अधिक माहितीनुसार, आज बुधवार (दि. 10) जुलै रोजी दुपारी दीड वाजता नशिकरोड भागातील गाडेकर मळा परिसरात बस डेपो आवारात हा अपघात घडला. या अपघातात सानवी सागर गवई (वय 5 वर्ष, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, नाशिकरोड) या चिमुरडीचा मृत्यु झाला आहे. मृत चिमुकली ही इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असून, शाळेतून ती तिच्या आजोबांसोबत आजी जिजाबाई गवई यांच्या बस डेपो आवरातील चहाच्या टपरीवर जात असताना सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने चिमूरडीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचे आजोबादेखील जखमी आहेत.

बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय

या अपघातातील बस चालक हा दारु पिऊन बस चालवत असल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे. संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, नाशिकरोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेची पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleनाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले
Next articleसीआयडी अधिकाऱ्यांच्या वाहनाचा गुरुदेव नगर हायवे वर अपघात: कर्मचारी सुखरूप; स्टेरिंगचा जाईंट तुटल्याने अपघात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here