Home बुलढाणा स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

117

आशाताई बच्छाव

1000529419.jpg

स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे

-मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम

बु‌लडाणा, दि. 08 : अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी दि. 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आज दि. 8 जुलै रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. सदर अभियान जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

श्री. जंगम यांनी अभियानादरम्यान पाणीपुरवठा योजनेतील गळती थांबवणे, शाळा, अंगणवाडीतील शौचालयाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ करणे, लोकसहभागातून परिसर स्वच्छता करणे, महिलांना स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देणे, एफटीके किटद्वारे पाण्याची नियमित रासायनिक व जैविक तपासणी करण्याचे निर्देश दिले. स्टॉप डायरीया अभियानांतर्गत अतिसाराबाबत व्यापक जनजागृती करून उघड्यावरील पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, महिलांना आरोग्याचे प्रशिक्षण देणे आदी उपक्रम अभियानादरम्यान राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, आरोग्य विभागाचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. आर. खरात, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे प्रकल्प संचालक शिवशंकर भारसाकळे यांनी प्रास्ताविक केले.

Previous articleबुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळित
Next articleअभिनेत्री अपूर्वा देशमुख हिने वृंदावन -मथुरा या ठिकाणी कुटुंबियांसोबत केला वाढदिवस साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.