Home अमरावती अभिनेत्री अपूर्वा देशमुख हिने वृंदावन -मथुरा या ठिकाणी कुटुंबियांसोबत केला वाढदिवस साजरा.

अभिनेत्री अपूर्वा देशमुख हिने वृंदावन -मथुरा या ठिकाणी कुटुंबियांसोबत केला वाढदिवस साजरा.

44
0

आशाताई बच्छाव

1000529730.jpg

अभिनेत्री अपूर्वा देशमुख हिने वृंदावन -मथुरा या ठिकाणी कुटुंबियांसोबत केला वाढदिवस साजरा.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख
. अमरावती जिल्हा विभागीय संपादक

अमरावती.
(मुंबई)

अभिनेत्री अपूर्वा अरविंद देशमुख हिचा ४ जुलै रोजी वाढदिवस असल्याने यंदाचा वाढदिवस हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने आणि कायमस्वरूपी लक्षात राहावा या उद्देशाने तिने पवित्र तीर्थक्षेत्र वृंदावन -मथुरा या ठिकाणाची निवड केली आणि आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला
अपूर्वा देशमुख ही अभिनय क्षेत्रातील एक यशस्वी कलाकार आहे.स्वामी समर्थ तसेच अनेक मराठी आणि हिंदी सिरियलमध्ये, चित्रपट तसेच वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये तिने आपल्या अभिनय कौशल्याचा यशस्वी ठसा उमटवला आहे
अपूर्वा मिनरल्स नागपूर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटन आणि संपर्क प्रमुख श्री.अरविंद देशमुख यांची अपूर्वा ही मुलगी जरी असली तरी अभिनेत्री म्हणून तिने स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे
आपला वाढदिवस साजरा करताना अपूर्वा सोबत वडील अरविंद देशमुख,आई सौ.मीनाक्षी देशमुख, मोठे बंधू अल्केश देशमुख आणि भाचा अर्पित देशमुख हे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते
४ जुलै आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी वृंदावन मथुरा येथे देवाचे कुटुंबातील सदस्यांबरोबर दर्शन घेतले तसेच मंदिर परिसरातील गरजू लोकांना आणि लहान मुलांना सरबत पेय वाटप केले आणि काही वेळ त्या मुलांसोबत गप्पा गोष्टी करत घालवला
अपूर्वाला सामाजिक कामाची फार आवड असून याचे बाळकडू लहानपणापासून वडील अरविंद देशमुख यांच्याकडून मिळाले
वृंदावन मथुरा येथे कुटुंबातील सदस्यांबरोबर तसेच तेजराम धर्मपाल चॅरिटेबल ट्रस्ट वृंदावन मथुरा येथील कर्मचाऱ्यांसोबत आपण साजरा केलेला वाढदिवस हा माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील तसेच यापुढे सुद्धा माझा वाढदिवस मी गरजूंना सहकार्य करुन साजरा करत जाईल अशी भावना युवा मराठा न्यूजशी प्रतिक्रिया देताना अभिनेत्री अपूर्वा अरविंद देशमुख हिने व्यक्त केली

Previous articleस्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावे -मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
Next articleश्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी रविवार दि. 14 जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here