Home अमरावती वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान....

वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड.

122

आशाताई बच्छाव

1000526916.jpg

वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात
महत्वपुर्ण योगदान. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.

अमरावतीयेथे स्थानिक महानायक संघटना, वऱ्हाड विकास व फुले-शाहु-आंबेडकर संघटनांचे वतीने शनिवार दि.६ जुलै रोजी शिवटेकडी च्या पायथ्याशी वृत्तपत्र विक्रेते व एजंट आयु. अशोकराव बागडे यांचे ६६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महानायक संघटनाचे प्रमुख व माजी नगरसेवक आयु. सुरेश मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आयु. अशोक बागडे यांच्या विविधांगी कार्यावर प्रकाश टाकला.
डॅा. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते. “ वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोकराव बागडे हे वृत्तपत्राच्या माध्यमातुन वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान देत असून फुले-शाहु-आंबेडकरांचे सत्यशोधकीय विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात समता सैनिकाचे भूमिका वठवित असल्याचे ते म्हणाले. ”
पत्रकार श्री. राजा वानखडे , ज्ञानेश्वर डोंगरे, देविलाल रौराळे, हरीश सुंदरवाने, शरफुद्दीन पठाण, बंडु मंडले, गजानन वानखडे, संजय गोंडाणे, प्रविण विघ्ने, वसीम काजी, प्रमोद शेंडे आदींनी आयु. अशोक बागडे यांचे अभिष्ठचिंतन करुन वृत्तपत्रीय व्यवसायाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करण्यास उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आयु. गोलु बागडे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी दलीत-आदीवासी-ओबीसी व अल्पसंख्याक मधील अनेकांची उपस्थिती होती. असे पत्रकार राजा वानखडे कळवितात.

Previous articleलोककलावंत श्रीकांत नागदेवे साकोली विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक
Next articleरायगड जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकरांनी केले शेकडोच्या संख्येत वृक्षांची लागवड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.