Home बीड विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने पंकजाताई मुंडेंचा केला सत्कार

विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने पंकजाताई मुंडेंचा केला सत्कार

129

आशाताई बच्छाव

1000524108.jpg

विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने पंकजाताई मुंडेंचा केला सत्कार

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:०६ जुलै २०२४ भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत भेटून शुक्रवारी दी.०५ जुलै रोजी सत्कार केला. दरम्यान पंकजाताई ची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. पंकजाताई मुंडे व डॉ.योगेश क्षीरसागर डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यांच्यासोबत बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाली ली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आणि महायुतीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून येत्या काळात जिल्ह्याचा विकास होईल असा विश्वास डॉ. योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आगामी राजकीय वाटचालीसाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पंकजाताई यांनी ‘आशीर्वाद ‘ दिले.

Previous articleआचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण
Next articleअमरावती विद्यापीठच्या शंभर कोटीच्या जनरल फंडात राहिले फक्त पाच लाख रुपये.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.