Home जालना आचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण

आचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण

27
0

आशाताई बच्छाव

1000524097.jpg

आचार्य विराग सागर महाराज यांचे समाधी समतापूर्वक मरण
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना येथील  देवमूर्ती येथे रात्री दोन वाजून 24 मिनिटांनी विरागसागर महाराज ह्यांचे शांततापूर्वक नमोकार मंत्र स्मरण करीत देह परिवर्तन झाले. आचार्य विराजसागर महाराज आचार्य विद्यासागर महाराजानंतर जैन समाजातील खूप मोठे आचार्य होते,  त्यांनी आतापर्यंत जवळजवळ साडेतीनशे शिक्षा प्रदान केल्या आहेत आणि त्यांचे शिष्य पूर्ण भारत वर्षामध्ये धर्मप्रभावना करीत आहेत त्यांना दोन दिवसांपूर्वी काही वेदना झाल्या होत्या आणि डॉक्टरांनी सांगितले की आपणास मेडिकल घ्यावे लागेल दिगंबर जैन संत अहिंसेचे पालन व्यवस्थित करीत असल्याने ऍलोपॅथिक मेडिकलचा त्यांचा पूर्णपणे त्याग असतो त्यामुळे त्यांनी दिगंबर मुनीपरंपरेचे पालन करत मी प्राणाहून ही प्रिय असा दिगंबर वेश मेडिकल ऍलोपॅथिक ग्रहण करून मलीन करणार नाही असे प्रण केले व त्यांनी दिगंबर मुनीपरंपरेचे कट्टरतेने पालन करीत मुनीपरंपराची अंतिम साधना समाधी ही उत्कृष्टरित्या साध्य केली. जैन समाजाची ही एक अपूर्णयक्षती आहे पूर्ण भारत वर्षासोबतच संपूर्ण विश्वातून आचार्य महाराजांच्या प्रति विनयांजली समर्पित करण्यात आली अशा गुरुदेवांच्या चरणी सकल दिगंबर जैन समाज जालना कोटी कोटी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु  निवेदन करून त्यांच्या आत्म्यास शीघ्र अति शीघ्र सिद्धपद प्राप्त होवो हीच भावना आहे.

Previous articleतनुजा नागदेवे कलाक्षेत्र 2024 पुरस्काराने सन्मानित
Next articleविधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने पंकजाताई मुंडेंचा केला सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here