आशाताई बच्छाव
माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दुःखद निधन ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते……….. माहोरा जालना प्रतिनिधी….. मुरलीधर डहाके.. दिनांक 23/06/2024 … सविस्तर वृत्त असे की माहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दिनांक २३ रोज रविवार या दिवशी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान दुःखद व दुर्दैवी निधन झाले.ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते. अत्यंत कमी वयात निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे , शाळेचे माहोरा गावचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. तसेच ते खूप मान मिळवू व कोणासाठी ही धाऊन जाणारे असे संतोष बोर्डे यांचे निधन झाल्यामुळे माहोरा परिसरातून तसेच जाफराबाद तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.