Home बीड बीडच्या शिवतीर्थावर ११० फूट उंचीचा शिवरायांचा भगवा झेंडा फडकणार!

बीडच्या शिवतीर्थावर ११० फूट उंचीचा शिवरायांचा भगवा झेंडा फडकणार!

151

आशाताई बच्छाव

1000491149.jpg

बीडच्या शिवतीर्थावर ११० फूट उंचीचा शिवरायांचा भगवा झेंडा फडकणार!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि:२३ जून २०२४ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ११० फूट उंचीचा बोल बसवून त्यावर शिवरायांचा भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. यासाठी आज रविवारी मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी जागेची पाहणी करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. यामुळे शिवप्रेमींकडून आनंद साजरा करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाणता राजा छत्रपती अश्वरूड देखना पुतळा असून, यामुळे शहराचे वैभव समजते. येथेच चौकात आता ११० फूट उंचीचा पोल उभारून त्यावर स्वराज्याची साक्ष देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज लावण्यात येणार आहे. यामुळे आणखीन चौकाची शोभा वाढणार आहे. यासाठी जागेची पाहणी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाला सुरुवात करत असताना यावेळी बांधकाम अभियंता किरण देशमुख, पाणीपुरवठा अभियंता राहुल टाळके, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, योगेश हाडे, यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवप्रेमींकडुन मुख्याधिकारी निता अंधारे यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleशेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’
Next articleमाहोरा येथील संतोष बोर्डे यांचे दुःखद निधन ते जिल्हा परीषद प्रशाला माहोरा चे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.