Home गडचिरोली शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’

123

आशाताई बच्छाव

1000491111.jpg

 

शेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’

जिल्हा समितीच्या बैठकीत निर्णय

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ): येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.

Previous articleदुचाकी चोरणारी चौकडी”क्राईम”कडून जेर बंद; ११ दुचाकी जप्त,
Next articleबीडच्या शिवतीर्थावर ११० फूट उंचीचा शिवरायांचा भगवा झेंडा फडकणार!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.