Home अमरावती दुचाकी चोरणारी चौकडी”क्राईम”कडून जेर बंद; ११ दुचाकी जप्त,

दुचाकी चोरणारी चौकडी”क्राईम”कडून जेर बंद; ११ दुचाकी जप्त,

47
0

आशाताई बच्छाव

1000491100.jpg

दुचाकी चोरणारी चौकडी”क्राईम”कडून जेर बंद; ११ दुचाकी जप्त,
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने आज रविवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. हेमंत राजेश चीलवंतेवय२३रा. पाच बंगला बडनेरा अमरावती., प्रदीप विजय बांगर वय १९रा. अंबिका नगर अकोला., रोशन राजू गावंडे वय २४रा. पाच बंगला बडनेरा . अमरावती. अमित नरेश ग्लानी.वय३४रा. सिंधी कॅम्प बडनेरा . अमरावती अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनशे पथक राजापेठ ठाण्यात दाखल दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. तपासात त्या गुन्ह्यात हेमंत प्रदीप, रोशन व अमित या चौघांचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी राजापेठच्या गुन्ह्याची कबुली दिली. सोबत आणखीन काही दुचाकी चोरी केल्याचा माहिती दिली. त्यानुसार त्यांच्याकडून शहरातील विविध भागातून चोरलेल्या ४ लाख १७ हजार रुपयांच्या तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुमार इंगोले, सत्यवान भुयारकर, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, चंद्रशेखर रामटेके, चेतन कराळे, योगेश पवार, रायली वाले, संदीप खंडारे प्रतिक यादव यांनी केली.

Previous articleपिंपरी चिंचवड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा सत्कार संपन्न
Next articleशेकापची गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ‘जनसंघर्ष यात्रा’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here