Home भंडारा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन सादर

51
0

आशाताई बच्छाव

1000488778.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 22 जून 2024 रोज शनिवारला अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेल द्वारे दिव्यांग यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत अखिल भारतीय धोतरा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी निवेदन सादर केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्यांगांच्या बाबतीत आज पावतो शासनाकडून कोणतीही मजबूत भूमिका घेतलेली नाही .त्यांना शासकीय कार्यालयापासून समाजापर्यंत घृण नजरेने बघत असतात. निर्वाचन आयोग कडून लोकप्रतिनिधींच्या कायद्यानुसार तरतूद केलेली नाही. शासनाने दिव्यांग बाबत खास कायद्याने द्वारे अतिसोयक्ती समजून तरतूद करावी व जेणेकरून दिव्यांगाना आधार मिळेल. त्यांना शासकीय निम शासकीय नोकरीत 10% आरक्षण देण्यात यावे. दिव्यांगांना समाजाचा कोणताही आधार नसल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे शासनाने दिव्यांग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या खालील मागण्याची पूर्तता करावी .भारतीय जनगणनेच्या कायद्यानुसार अपंगाची जनगणना करून निवडणुकीमध्ये दहा टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावेत व त्याचप्रमाणे शासनाच्या विविध मंडळावर अपंगाचे प्रतिनिधी आधस्वीकृती देण्यात यावी ,दिव्यांगांचा मनोबल वाढविणे व त्यांचे स्वामित्व घडविण्याचे विविध योजना तयार करून राबविण्यात यावे ,भारतीय विधीसाठी मजबूत असे संशोधन करून कायद्याची तरतूद करावी ,दिव्यांगासाठी ग्राम स्तरापासून जिल्हास्तरापर्यंत नोंदणी करून स्वयंरोजगाराची व शासकीय नोकरीची सोय करावी, दिव्यांगासाठी शहरी स्तरावर शासकीय योजनेद्वारे ऋणानुबंध या योजनेची जातीय, धर्म,पंथ ,यांच्या सलोखा ठेवून विवाह मेळावे घेऊन पुरस्कृत करावे ,आंध्र प्रदेशच्या सरकार प्रमाणे एन.टी.आर. (नान ट्रेडिशन रिइन्शुरन्स) योजनेअंतर्गत दिव्यांगांना दहा हजार रुपये मासिक उदरनिर्वाह भत्ता म्हणून योजनेची तरतूद करावी, दिव्यांगांना मोफत घरे बांधून तीन एकर ओलिताची जमीन देण्याची तरतूद करण्यात यावी ,दिव्यांगांना शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची घृणास्पद

वागणूक होऊ नये .अशी तरतूद करून निम्म प्रकारे कार्यालयामार्फत सेवा पुरविण्याची तरतूद करावी ,दिव्यांगांना प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षणाची सोय करावी ,दिव्यांगांना स्पर्धात्मक परीक्षेची सोय करून पुरस्कृत करावे ,दिव्यांगांना भविष्य निर्वाह निधी शासनाकडून तरतूद करावी, दिव्यांगांना त्यांचे पात्रतेनुसार स्वयंरोजगाराचे गाडे उपलब्ध करून स्वयंरोजगारासाठी दोन लाखाचा निधी उपलब्ध करण्यात यावा ,दिव्यांगांना उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा खाजगी रुग्णालयात विनामूल्य देण्यात यावे इतर दिव्यांगांच्या मागण्यांची शासनाने तरतूद करावी ,शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2022/प्रक्र 79/दिनांक क/2/मंत्रा/ मु दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या परिपत्रकाची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी ,राज्यातील सामान्य नागरिक व अपंगांना 300 युनिट पर्यंतमोफत वीज पुरवठा करण्यात यावा व त्यापेक्षा जास्त असल्यास चार रुपये प्रमाणे विज बिल पूर्तता करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय धृतरा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुतरा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी शासनाकडे केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here