आशाताई बच्छाव
बोरखेडीतील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये योगादिवस साजरा
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रीनलँड इंग्लिश स्कूलमध्ये
आंतराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख
पाहुण्या म्हणून शाळेच्या अध्यक्षा सारिकाताई कटके तर योगाचे
प्रात्यक्षिक सुशीलकुमार गुढेकर, दुर्गा चव्हाण व राजेंद्र जैवाल यांनी
केले. योगाचे महत्त्व सचिन आठवले ह्यांनी सागितले. हा कार्यक्रम
यशस्वीरित्या करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुशिलकुमार गुढेकर, संतोष
कांबळे, यश गायकवाड,सचिन आठवले, राजेंद्र जैवाल, उमेश घोरपडे,शिक्षिका
अश्विनी कांबळे, पुष्पा राऊत, विजया उबाळे, अंबिका बन, दुर्गा चव्हाण,
पुजा कांबळे, कांचन श्रीरामवार, जॉयसी पंडित आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शाळेची विद्यार्थ्यांनी जयश्री यांनी आभार व्यक्त केले.