Home उतर महाराष्ट्र पांढरीपूल घाटात डांबराचा सडा अपघाताला निमंत्रण; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

पांढरीपूल घाटात डांबराचा सडा अपघाताला निमंत्रण; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

165

आशाताई बच्छाव

1000488001.jpg

पांढरीपूल घाटात डांबराचा सडा

अपघाताला निमंत्रण; संबंधित विभागाचे दुर्लक्ष

सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटात तीन दिवसांपूर्वी कंटेनर उलटल्याने रस्त्यावर पडलेल्या पिंपातून सांडलेले डांबर संबंधित विभागाने उचलून घेण्याची तसदी घेतलेली नाही. कडक उन्हामुळे डांबर वितळण्यास सुरुवात झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचा प्रवास धोकादायक झाला आहे.

पांढरीपूल येथील इमामपूर बाटाच्या मध्यावर मंगळवार (ता.१८) रोजी डांबराचे पिंप घेऊन जाणारा कंटेनर उलटला, कुठलीही चूक नसताना खरवंडी (ता. नेवासे) येथील अनिल फाटके यांचा अंगावर
पिंप पडून मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी दीपाली फाटके गंभीर जखमी झाली होती. यानंतर तब्बल आठ तास वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. घाट वळणावर महामार्गाचे पोलिस कारवाई करता थांचत असल्याने काही
चालकांची धांदल उडून अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, येथे प्रभावी उपाययोजना आवश्यक आहे. भरधाव वेगातील बाहन हॉटेल व टपरीत घुसल्याचे प्रसंग अनेकदा झाले आहेत.
येथे २८ जानेवारी रोजी घाट उतरताना एका ट्रकच्या धडकेत अनिल पवार, त्यांची पत्नी व दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर वांजोळी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्य
पांढरीपूल येथील घाट मार्गात अपघाताला निमंत्रण देणारे पडलेले पिंप व सांडलेले डांबर.
अधिकाऱ्यांनी भेट देऊन साइड गटार, सूचना फलक, गतिरोधकबाबत दिलेले आश्वासन कृतीत उतरलेले नाही.