आशाताई बच्छाव
वादग्रस्त पत्रकांमुळे नाशिक मध्ये तणाव, पोलिसांच्या सजगतेने परिस्थिती नियंत्रणात
प्रतिनिधी-सतीश सावंत
दिनांक- 22 जून 2024
दोन समाजांमध्ये मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील काही भागात वादग्रस्त पत्रके आढळली. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने नाशिकच्या पंचवटी परिसरात आज पहाटेच्या सुमारास काही वादग्रस्त पत्रके टाकण्यात आली. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील फुलेनगर येथे हा प्रकार घडला असून या पत्रकांमध्ये विशिष्ट समाजाला हिणवण्याच्या उद्देशाने ही पत्रके तयार करण्यात आली होती. यामुळे नागरिक संतप्त झाले आणि या पत्रकांमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती असल्याने काही काळ या भागात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
शहरातील हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांच्या संघटने कडून ही पत्रके वाटण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे या विरोधात रिपाइचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, दीपक डोके, अर्जुन पगारे, प्रशांत जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असताना ही घटना घडली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पुढील तपास केला. वैयक्तिक वादातून संबंधित व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार घडवून आणण्याचे समोर आले आहे. तसेच या कथित पत्रकात एक इमारत देखील होती त्या इमारतीला इजा पोहोचविण्याचाही उद्देश असल्याचे दिसून आले.
तसेच शहरातील एका मंदिराबाहेर लावलेला स्तंभ काढावा अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला होता. ही पत्रके आढळल्यानंतर त्यातील आक्षेपार्ह मजकुरामुळे नागरिक संतप्त झाले आणि या विरोधात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि पंचवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला शांत केले. सुमारे दोन तास हे प्रकरण सुरू होते ते संपूर्ण शहरात पसरल्याने अन्य भागातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसताच तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असल्याने पोलिसांनी सतर्कता बाळगत हे प्रकरण शांत केले. शहरात तणाव वाढू नये तसेच सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असून सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन नाशिक शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.






