आशाताई बच्छाव
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी):- पामा ग्लोबल अबॅकस ॲण्ड मेंटल अर्थमॅटिक असोशियन आयोजीत..
१२ वी पामा इंडिया नॅशनल कॉम्पिटीशन पुणे येथील नॅशनल स्पोर्ट पार्क, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये आरुष ढोकचौळे, समरजीत जगधने, रौनक सिंग, गार्गी गाढे, विराज कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच आरुष ढोकचौळे हा त्याचे गटामधून चॅम्पियन ठरला. तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून सन्मान चिन्ह मिळविले. तसेच विद्यार्थ्यांना व्हिएतनाम देशामध्ये आयोजित होणा-या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी भाग घेण्याची संधी मिळाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना डि पॉल पब्लिक स्कूलचे फादर शिजो, सिस्टर दिप्ती व शिक्षक यांचे तसेच डि पॉल पब्लिक स्कूलच्या वतीने सदर स्पर्धेची तयारी करून घेणेकरीता संचालिका लुबना पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल डि पॉल पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांचे अभिनंदन केले.