Home गडचिरोली विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या

विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या

186

आशाताई बच्छाव

1000485554.jpg

विधान परिषदेची १ सीट जिल्ह्यातील ओबीसी वा इतर समाजाला द्या

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैयक्तिक रित्या पार्टीकडे केली मागणी

मागील ३०-४० वर्षांपासून पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य देण्याची केली विनंती.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या ११ जागांची निवड होणार असून त्यामध्ये १ जागा गडचिरोली जिल्ह्याला देऊन मागील ३०-४० वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या ओबीसी व इतर समाजातील नेत्यांना संधी द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी वैयक्तिकरित्या पार्टीकडे केली आहे.

गडचिरोली जिल्हा हा लोकसभा व विधानसभेसाठी आदिवासी समाजासाठी आरक्षित असल्याने इतर समाजाच्या नेत्यांना आमदार खासदार होण्याची संधी नाही. तरीही मागील अनेक वर्षांपासून पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. आमदार खासदार होता आले नाही तरीही ते अत्यंत निष्ठेने पार्टीचे काम करीत आहेत. करिता या विधान परिषदेच्या निमित्ताने १ सीट ओबीसी व इतर समाजातील निष्ठावान कार्यकर्त्यांना द्यावी अशी वैयक्तिकरित्या मागणी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी पार्टी नेतृत्वाकडे केली आहे.

Previous articleनांदेड येथे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात आयोजन
Next articleराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.