Home उतर महाराष्ट्र कोपरगावचा शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना.

कोपरगावचा शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना.

75
0

आशाताई बच्छाव

1000485657.jpg

कोपरगावचा शारदा शाळेत १८०० विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी केली एकत्रित योगसाधना.
श्रीरामपूर (दिपक कदम)दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात.ही जागतिक घटना योगाच्या प्राचीन भारतीय पद्धतीला आणि त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कल्याणावर खोल परिणाम करतात.योग हा शब्द संस्कृत शब्द “युज” वरून आला आहे, ज्याचा अर्थ “सामील होणे” किंवा “एकत्रित होणे” आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे.त्याचेच औचित्य साधत सोमैय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सौ सुजाता शेडगे,रुपाली जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली १८०० विध्यार्थी व शाळेच्या शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनी एकत्रित योग साधना केली.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे.हीच प्राचीन परंपरा नविन पिढीला निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल. म्हणून जगभरात २१ जुन आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.स्वत:साठी आणि समाजासाठी योग या थीमसह आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा करण्यात आला आहे.यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,हायस्कूल पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,प्राथमिक पर्यवेक्षिका सौ पल्लवी ससाणे,प्री प्रायमरी पर्यवेक्षिका सौ नाथलीन फर्नांडिस व शाळेतील शिक्षक वृंदानी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आनंद घेतला.

Previous articleराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेमध्ये आरूष ठरला चॅम्पियन
Next articleबुधवत साहेब जरा जीभ आवरा हो.. – शिवराळ भाषाने विधानसभेत मावळणार अशा? – म्हणे गांडूची औलाद नाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here