Home नांदेड विद्युत पोल पडल्याने लाईट बंद नागरिकांचे हाल

विद्युत पोल पडल्याने लाईट बंद नागरिकांचे हाल

121

आशाताई बच्छाव

1000482876.jpg

विद्युत पोल पडल्याने लाईट बंद नागरिकांचे हाल

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड- तालुक्यातील मौजे तांदळी येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब (पोल) मोडल्यामुळे मौ. तांदळी येथे पिण्याचे पाणी व दळण बंद आहे
तांदळी शिवारात विद्युत पोल मोडले असल्या कारणाने विद्युत पुरवठा बंद आहे. करिता गावातील जनतेचे पाण्याविना हाल होत आहेत. संबंधित बाब विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली असता ही बाब माझ्या अधिकारातील नाही वरिष्ठांशी बोला असे उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत.
परिणामी गेल्या दहा दिवसात विद्युत तारांचा स्पर्श होऊन म्हैस दगावली आहे. तसेच गेले वर्षी त्याच डीपीला चिकटून शेळी मेली आहे. काल दि. 13/06/2024 रोजी दोन बैल व एक तरुण शेतकरी त्याच डीपीला चिकटला होता पण सुदैवाने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने त्यांची जीवितहानी टळली आहे. असे असताना देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नाहीत. बऱ्याच खांबावरील तार लोंबकळत आहेत, शेतीतील कामे करत असताना शेतकऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. यामुळे काही अप्रिय घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेकवेळा निदर्शनास आणून दिले आहे. पण यात अद्याप काही सुधारणा केलेली नाही.

जय जवान जय किसान केशव पाटिल तांदळीकर यांच्या नेतृत्वात आज मुखेड तहसील कार्यालय व महावितरण कंपनी च्या वतिने होणारी गैरसोय यांचा फटका सर्व सामान्य लोकांना होत असुन ते थांबुन सर्व सामान्य लोकांना सुरळीत लाईटची व्यवस्था करण्यात यावी या साठी पत्र देण्यात आले वेळी उपस्थित काका पाटील होणवडजकर मोहन पाटील होणवडजकर ,विकास पाटील तांदळीकर विश्वा गायकवाड,कुनाल कांबळे ,बाबुराव गायकवाड आदी शेतकरी बांधव व विश्वा गायकवाड यांची उपस्थित होते.