Home नांदेड इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी 10 वाजता सुरू करा, या मागणीसाठी विद्यार्थी, पालक,...

इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी 10 वाजता सुरू करा, या मागणीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक कृती समितीचे 24 रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन.

64
0

आशाताई बच्छाव

1000482884.jpg

इंग्रजी माध्यमांच्या शाळा सकाळी 10 वाजता सुरू करा,
या मागणीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक कृती समितीचे 24 रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

नांदेड दि. 20 –
नांदेड जिल्ह्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या सीबीएससी आणि स्टेट बोर्ड अशा अनेक शाळा पहिली ते बारावीपर्यंत सुरू असून या सर्व शाळांच्या वेळापत्रकामध्ये योग्य ताळमेळ दिसून येत नाही. काही शाळा सकाळी सात 7 वाजता सुरू होत असून काही शाळा सकाळी 8 वाजता सुरू होतात तर काही शाळा दुपारी 12 वाजलेपासून सुरू होत आहेत. ज्या शाळा सकाळी 7 वाजता सुरू होतात त्या शाळेत जाणार्‍या मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्या मुलांना सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही, अशा मुलांमध्ये लठ्ठपणा व इतर आजाराचे प्रमाण वाढत असून त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासन यांच्या नियमावलीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळी 10 ते 4 या वेळेत सुरू होत असून तोच नियम इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांना लागू करणे गरजेचे आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळा विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्न पुस्तकाशिवाय बाजारातील खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकाची सक्ती करत आहेत, त्या पुस्तकांचा दर प्रति सेट पहिली ते दहावी साधारणपणे 5000 ते 10 हजार रुपये इतका असून विद्यार्थी आणि पालक यांच्यावरती विनाकारण मोठे आर्थिक आणि मानसिक भुर्दंड पडत असून इंग्रजी शाळा विद्यार्थी आणि पालक यांची ऐकायला तयार नाहीत. याशिवाय शिक्षकांना सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शाळेत बोलावून त्यांच्या अतिरिक्त वेळेचा मोबदला देत नाहीत. उलट त्यांना अतिशय तुटपुंजी पगार दिला जात असून शिक्षकांचेसुद्धा इंग्रजी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक शोषण केले जात आहे.
या सर्व बाबींची उच्चस्त्रीय चौकशी करून आपण तात्काळ इंग्रजी माध्यमांच्या शाळा वरती नियंत्रण प्रस्थापित केले पाहिजे व तात्काळ नांदेड जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे वेळापत्रक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 10 ते ते 4 याच वेळेत ठेवण्यात यावे, अन्यथा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने दि. 24 जून रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 4 या वेळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक कृती समितीच्या वतीने प्रचंड धरणे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय स्टुडंट्स फेडरेशनचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. प्रकाश कोथळे, प्रा. दत्ता हळदे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, पँथर सुरेश सावते, नागोराव कुडके, अविनाश अंधारे, भूषण लोखंडे, माधव भालेराव, बजरंग भुयारे, मनोज सोनकांबळे आदींनी शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर व शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बीरगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

Previous articleविद्युत पोल पडल्याने लाईट बंद नागरिकांचे हाल
Next articleआयशा उर्दू हायस्कुल मधे मुलींना मोफत सायकल वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here