Home मुंबई गेला पाऊस कुणीकडे, राज्यात पावसाने फिरवली पाठ तूमच्या जिल्हात किती पडला पाऊस...

गेला पाऊस कुणीकडे, राज्यात पावसाने फिरवली पाठ तूमच्या जिल्हात किती पडला पाऊस पहा?

40
0

आशाताई बच्छाव

1000482451.jpg

.
गेला पाऊस कुणीकडे,

राज्यात पावसाने फिरवली पाठ

तूमच्या जिल्हात किती पडला पाऊस पहा?

मुंबई,(विजय पवार उपसंपादक): मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला. बळीराजाने मान्सूनच्या आगमनानंतर काही जिल्ह्यात लगेचच पेरणीलाही सुरुवात केल्याचं दिसून आलं. जुनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र कोळलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे.
गेल्या आठवडाभरापासून मान्सून विदर्भात रेंगाळलेला आहे. आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी काढली तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे दुष्काळी भागातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. तर, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत आजही पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाले.
पण, मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन अद्याप आले नाहीत.
राज्यातील अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत.

१४ जिल्ह्यात सरसरीपेक्षा कमी पाऊस

राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई शहर,मुंबई उपनगर,रायगड,रत्नागिरी,कोल्हापूर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले.
नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

राज्यात १ जून २०२४ पासून १८ जून २०२४ पर्यंत झालेला पाऊस

जिल्हा सरासरी पडलेला पाऊस

पुणे
१२२.६
92.9

सोलापूर
१८४.६
६८.७

अहमदनगर
१०३.६
६६.९

धाराशिव
३२१.५४
३२.७

लातूर
१९९.५४
३२.७

बीड
१३८.८
७५.८

छत्रपती
संभाजीनगर
269.5 4
45.6

नाशिक
86.4
83.6

धुळे
61.9
63.9

नंदूरबार
10.2
68.5

नांदेड
54.9
73.8

परभणी
134.2
75.1

जालना
122.3
71.7

जळगाव
99.2
56.8

बुलढाणा
105.5
69.1

हिंगोली
13.9
88.1

अकोला
84.1
76.1

वाशिम
121.1
85.5

अमरावती
57.4
73.1

यवतमाळ
65.5
81

वर्धा
49.5
73.7

चंद्रपूर
32.9
77.5

गडचिरोली
35.10
1.3

नागपूर
40
68.7

भंडारा
14.8
74.6

गोंदिया
16.6
77.7

पालघर
114.11
62.6

ठाणे
112.3
184.8

मुंबई शहर
146.3
268.6

रायगड
184.7
275.4

रत्नागिरी
280.2
398.9

कोल्हापूर
100
171.8

सिंधुदुर्ग
386.1
461.1

सांगली
123
77.2

सातारा
113.2
100.7

काही भागांत अधिक पाऊस
मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला.
काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले.
नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे

Previous articleधर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
Next articleविद्युत पोल पडल्याने लाईट बंद नागरिकांचे हाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here