आशाताई बच्छाव
शितल नागदेवे कलारत्न पुरस्काराने सन्मानित
पवनी– कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा दि.09 जून 2024 रोज रविवारला दुपारी 3 वाजता पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी ( चिचाळ ) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार ,गायिका व कवी शितल अतुल नागदेवे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ .अक्षय कहालकर उपस्थित होते .तर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती भंडारा ,रोशन जांभुळकर भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष , सदानंद धारगावे विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष तर विशेष अतिथी म्हणून कवी मकरंद पाटील जळगाव महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी . सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम, कवी व प्रबोधनकार नाशिक चवरे, इंजिनीयर रूपचंद रामटेके तर सत्कारमूर्ती म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते. .
यावेळी रोशन जांभुळकर चंद्रशेखर ,चंद्रशेखर टेंभुर्णे ,सत्कारमूर्ती सत्कारमूर्ती संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन केले. तर मकरंद पाटील जळगाव यांनी सत्कारमूर्ती पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या जीवनावर कविता सादर केली. प्रबोधनकार भावेश कोटांगले त्याचप्रमाणे तनुजा नागदेवे यांनी संजीव भांबोरे यांच्या जीवनावर गीत सादर केले. प्रास्ताविक प्राध्यापक शेखर बोरकर यांनी केले तर आभार विलास केजरकर यांनी मानले.
कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर जिल्ह्यात म्हणून ओळख आहे, अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रूग्णांची सेवा केली करण्यात आली यात एकूण 55 रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला “खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा” ह्या दृष्टीकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे. तसेच पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी दवाखाना मार्फत पुढाकार घेण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा चे डॉ.अक्षय कहालकर, शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर, सचिव मीराताई कहालकर, पंकज कहालकर, शितल चामट यांनी सहकार्य केले. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल डी जी रंगारी, जगदीश रंगारी ,यादवराव गणवीर, रेखा रामटेके, प्रक्षिक मोटघरे,त्रिवेणी मेश्राम व इतर कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.