Home जळगाव प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून पत्नीने दिराच्या साथीने केला पतीचा खून

प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून पत्नीने दिराच्या साथीने केला पतीचा खून

383

आशाताई बच्छाव

1000478344.jpg

प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून पत्नीने दिराच्या साथीने केला पतीचा खून

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- पतीच्या नियमीत होणार्‍या त्रासाला कंटाळून पत्नीने चुलत दिराशी पे्रेमसंबंध ठेवले.या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होईल म्हणून पत्नीने दिराच्या मदतीने ब्लेडच्या सहाय्याने पतीच्या पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीसांनी शिताफीने तपास करून मयताच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर या खूनाचे रहस्य समोर आले. पतीचा खून करणार्‍या पत्नीसह तिचा प्रियकर अशा दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग 52 वर कोदगाव शिवारात कुणाल बुुंदेलखंडी यांच्या शेताजवळ मंगळवार 18 रोजी रात्री 10.45 वाजेच्या पूर्वी बाळू सिताराम पवार रा. गवळीवाडा, नायडोंगरी ता. नांदगाव याचा मृतदेह आढळून आला. कोणत्यातरी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता धरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
मात्र बाळू पवार यांच्या मृत्युबाबत पोलीसांनी शंका आल्याने फॉरेन्सिक टीमला पाचारण केले.घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड मिळून आला. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खूणा आढळून आल्या. दगड व ब्लेडने गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
पोलीसांनी मोबाईल क्रमांकाच्या आधारे व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे वंदना पवार हिचे लोकेशन घेतले असता ती चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती मिळाली.पोलीसांनी तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले.तिचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने पोलीसांनी तिला बोलते केले असता पतीच्या खूनाची कबुलीच तिने दिली.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत बाळू पवार याची पत्नी वंदना बाळू पवार व गजानन राजेंद्र पवार या दोघांच्या विरोधात भादंवि कलम 302,201,120ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleजाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे दुर्लक्ष.
Next articleशितल नागदेवे कलारत्न पुरस्काराने सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.