
आशाताई बच्छाव
जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे दुर्लक्ष.
तालुक्यातील ग्रामपंचायतींनी धूर फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी
प्रतिनिधी महोरा-मुरलीधर डहाके
29/06/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील बऱ्याच गावच्या ग्रामपंचायती नाले सफाई, गटारी साफ न करणे, स्वच्छतेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे जाफराबाद तालुक्यातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे. साथीचे आजार पसरु नये यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत स्थरावर काळजी घेतली जावी अशा सूचना द्याव्यात अशी मागणी जनतेतून दिसुन येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला रूग्ण संख्या सुध्दा वाढतांना दिसत आहेत. डास नष्ट करण्यासाठी धूर फवारणी करणे आवश्यक आहे.तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासनाने आपापल्या गावातील घाण साफ करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी जाफराबाद तालुक्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.याकामी ग्रामपंचायत प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छ्ता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.गावातील स्वच्छता व धुर फवारणी साठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.त्या निधीचा वापर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करून व साथीच्या आजारांपासुन नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी करावा अशा प्रतिक्रिया तालुक्यातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.ग्रामपंचायतीला धुर फवारणी साठी दरवर्षी शासन पैसा उपलब्ध करून देत असतं, त्याविषयी नागरिकांनी सजग राहून गावाचा विकास करणे आवश्यक आहे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काही ठिकाणी तर ग्रामसेवक,सरपंच यांचेकडे तक्रार करुणही लोकांच्या अडचणींची लवकर दखल घेतली जात नाही. असे नागरीकांचे म्हणणे आहे.