आशाताई बच्छाव
बीड जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी झाले निगरगट्ट!
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:१८ जून २०२४ जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कधी, कशाप्रकारे रुग्ण व नातेवाईकांचा छळ करतील याचा काही नेम राहिला नाही. आज दिनांक 18 जून 2024 मंगळवार रोजी सकाळचे सव्वानऊ वाजले तरी रुग्णांना चिट्ठी देणारा कर्मचारी कर्तव्यावर आला नाही. यामुळे शेकडो रुग्णांची लांबलचक रांग सकाळी आठ वाजल्यापासून ताटकळत उभी होती. तेव्हा याची तक्रार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांना तेथील काही रुग्णांनी भ्रमणध्वनी द्वारे केले असता डॉ नागेश यांनी संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून झापल्याने त्याची पाचावर धारण बसली आणि तो पळतच येऊन रुग्णांना चिठ्ठ्या देण्यासाठी बसला. यावरून जिल्हा रुग्णालया कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स, परिचारिका कितीही रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असले तरीही कर्मचारी मात्र त्यांच्या चांगल्या प्रयत्नावर पाणी फेरू लागल्याचे दिसून येत असल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी किती निगरगट्ट झाले आहेत याची प्रचिती येत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात अतिरिक शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण तसेच अनेक विभागातील डॉक्टर्स रुग्णांना चांगल्यात चांगली व आपलेपणा दाखवणारी चिकित्सा देत असले तसेच परिचारिका चांगली सेवा करत असल्या तरीही काही कर्मचारी मात्र कर्तव्यावर कसूर करण्यापासून चुकत नाहीत. यामुळे रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागते परंतु याचे कुठलेही सोयरसुतक कामचुकार आणि हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असल्याचे दिसत नाही. अशा निगरगट्ट झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची मात्र ससेहोलपट होत आहे.