Home जळगाव पाणीपुरी मुळे तब्बल 90 ते 100 लोकांना विषबाधा ,

पाणीपुरी मुळे तब्बल 90 ते 100 लोकांना विषबाधा ,

150
0

आशाताई बच्छाव

1000476214.jpg

पाणीपुरी मुळे तब्बल 90 ते 100 लोकांना विषबाधा ,

चोपडा जळगाव प्रतिनिधी :
सुरेंद्र बाविस्कर

चोपड्या तालुक्यातील कमळ गावाचा सोमवारी बाजार होता बाजारात जवळपासचे गावे
चांदसनी ,रूखनखेडा, पिंपरी, मितावली, या खेड्यांवरून सुद्धा गावकरी बाजारासाठी आले होते
बऱ्याच लोकांनी बाजारात पाणीपुरी खाल्ली आणि घरी सुद्धा घेऊन गेले पण पाणीपुरी खाऊन भलतेच घडले, ज्यांनी ज्यांनी पाणीपुरी खाल्ली होती त्यांना सकाळी पहाटे पहाटे उलटी जुलाब आणि ताप असा त्रास सुरू झाला सुरुवातीला काही समजून आले नाही नंतर समजले ज्यांनी ज्यांनी रात्री पाणीपुरी खाल्ली होती त्यांनाच हा त्रास होत आहे लगेच आडावद पोलीस स्टेशनला जाऊन हा सर्व प्रकार ग्रामस्थांनी सांगितला. आणि पाणीपुरी वाला हा सदर देवगाव चा असून त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तसेच मा:आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार मा:चंद्रकांत अण्णा यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी चोपडा शासकीय रुग्णालयातून तात्काळ ॲम्बुलन्स मागून लवकरात लवकर पाचही गावांचे पेशंट आडावद शासकीय रुग्णालयात आणि चोपडा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले व चोपडा येथे डॉक्टर शरद पाटील यांनी तात्काळ सर्व पेशंटला ऍडमिट करून उपचार सुरू केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here