Home उतर महाराष्ट्र नगर संभाजीनगर महामार्गावर इमामपूर पांढरी पूल घाटात पुणेहून संभाजीनगरकडे डांबर घेऊन जाणाऱ्या...

नगर संभाजीनगर महामार्गावर इमामपूर पांढरी पूल घाटात पुणेहून संभाजीनगरकडे डांबर घेऊन जाणाऱ्या कंटेनर घाटातील वळणातव दुचाकी स्वराचा अंगावर पलटी

248
0

आशाताई बच्छाव

1000475116.jpg

सोनई दी.१८ ( कारभारी गव्हाणे). नगर संभाजीनगर महामार्गावर इमामपूर पांढरी पूल घाटात पुणेहून संभाजीनगरकडे डांबर घेऊन जाणाऱ्या कंटेनर घाटातील वळणातव दुचाकी स्वराचा अंगावर पलटी होऊन झालेला भीषण अपघातात वडील ठार तर मुलगी गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज मंगळवार सकाळी११ वाजता घडली. भीषण अपघात घडला. अनिल दगडू फाटके वय 45 राहणार खरवंडी तालुका नेवासा असे असून मुलगी दिपाली अनिल फाटके वय१९ हि गंभीरित्या जखमी झाल्या असून तीच्या डोक्याला जबर मार लागला असून हात व पाय फ्रॅक्चर झाल्याने त्तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले रुग्णवाहिकेतून दोघांना रुग्णालात दाखल केले असता यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची सांगण्यात आले सत्तर ची घटना अत्यंत दुर्दैवी घडली असून वडील हे मुलीला महाविद्यालयातील शिक्षणासाठी प्रवेश देण्यासाठी जात असल्याचे माहिती मिळाली आह इमामपूर पांढरी पुल घाटात हा भीषण अपघात घडल्याने नेवासा तालुक्यात या अपघात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर घाटामध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात कोडी झाली . पोलिसांनी वाहतूक नंतर सुरळीत केली पांढरी पूल इमामपूर घाट हा कायम अपघात ग्रस्त क्षेत्र वाहनांना ब्रेक लागत नसल्याने अनेक वाहने एकमेकांवर धडकतात व भीषण अपघात होऊन अनेकांचे बळी या घाटात गेलेला आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने याबाबत तीव्र नाराजी पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here