Home नाशिक ताहराबाद वनविभागाकडून आदिवासींची क्रुर थट्टा! उपोषणकर्ते आंदोलकांची केली घोर फसवणूक!! संबंधितांवर फसवणूकीचे...

ताहराबाद वनविभागाकडून आदिवासींची क्रुर थट्टा! उपोषणकर्ते आंदोलकांची केली घोर फसवणूक!! संबंधितांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचा महासंघाचा इशारा…

349
0

आशाताई बच्छाव

1000475041.jpg

ताहराबाद वनविभागाकडून आदिवासींची क्रुर थट्टा! उपोषणकर्ते आंदोलकांची केली घोर फसवणूक!!
संबंधितांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचा महासंघाचा इशारा…
ताहराबाद,(प्रतिनिधी प्रविण भील, वामन शिंदे)- मांगीतुंगी (भिलवाड) ता.सटाणा येथील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबत युवा मराठा महासंघाच्या वतीने ताहराबाद वनविभागाच्या कार्यालयासमोर दि.१० जुन रोजी ‘न भुतो न भविष्यती’असे मोठे आमरण उपोषण आंदोलन करण्यात आले.हे जनआंदोलन युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांच्या नेतृत्वात पार पडले.
या आंदोलनाचा धसका घेऊन, सायंकाळी पाच वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे यांच्या वतीने वनपरिमंडळ अधिकारी तुषार देसाई व मोरे यांनी उपोषणकर्ते आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य करीत असल्याबाबतचे व्हिडिओ, वृत्तपत्रांच्या बातम्या तसेच लेखी पत्र महासंघाकडे उपलब्ध आहे.
असे असताना दि.११ जुन रोजी मांगीतुंगी (भिलवाड) येथील महासंघाच्या आदिवासी बांधवांनी उपोषणात मिळालेल्या लेखी आश्वासनानुसार कामकाजास सुरूवात केली असता ताहराबाद वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी सहाणे, तुषार देसाई,व मोरे यांनी घुमजाव करीत आदिवासी बांधवांना विरोध केला,व आम्ही असे आश्वासन दिलेच नाही अशी दुटप्पी भुमिका घेत आदिवासी बांधवांची क्रुर थट्टा करुन घोर अपमान केला.शिवाय उपोषणकर्ते आंदोलकांची फसवणूक करून लोकशाहीचा मुडदा वनविभागाच्या या तिघांही अधिका-यांनी पाडला आहे.त्यामुळे या तिघांही अधिका-यांविरोधात आता अनुसूचित जाती जमाती आयोग दिल्ली, महाराष्ट्राचे लोकायुक्त यांचेकडे तक्रार करुन दाद मागितली जाणार आहे.तर आंदोलकांची फसवणूक केली म्हणून वरील तिघाही अधिका-यांविरोधात न्यायालयामार्फत फसवणूकीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.तर लवकरच न्याय हक्काच्या लढाईत हजारो आदिवासी बांधवासह नाशिक येथील सी.सी.एफ.कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here