Home जालना मित्रत्वातून संघटना आणि संघटनेतून सेवा असा हा महासंघ म्हणजे समानार्थी शब्दच!

मित्रत्वातून संघटना आणि संघटनेतून सेवा असा हा महासंघ म्हणजे समानार्थी शब्दच!

104

आशाताई बच्छाव

1000418423.jpg

मित्रत्वातून संघटना आणि संघटनेतून सेवा असा हा महासंघ म्हणजे समानार्थी शब्दच!
अ. भा. जैन श्वेतांबर सोशल ग्रुपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ.सौ.सोनल व गौतमसिंग मनोत
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):  अ. भा. जैन श्वेतांबर सोशल ग्रुपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉ. सौ.सोनल मुनोत  व श्री. गौतमसिंग मुनोत यांची दुसर्‍यांदा म्हणजेच फेरनिवड करण्यात आली आहे. इंदौर येथील लता मंगेशकर सभागृह राजेंद्रनगर येथे नुकतीच उभय दाम्पत्यांना मान्यवरांंच्या उपस्थितीत पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. यावेळी जालन्याहून खासकरुन संजय देसरडा, त्यांची पत्नी विद्युलता देसरडा, तसेच संदीप गोयल, मनोज झंवर, भारती रुणवाल यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे याच समारंभात डॉ. सौ. सोनल मुनोत व श्री. गौतमसिंग मुनोत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्यांना दुसर्‍यांदा राष्ट्रीय उपाध्यक्ष पद भुषविण्याची संधी देण्यात आली.  हा महासंघ म्हणजे सेवेचा समानार्थी शब्द बनला असून आपण गत दोन वर्षात जसे कार्य केले आहे, तसेच कार्य यापुढेही करत राहू, अशी ग्वाही यावेळी श्री. गौतमसिंग मुनोत व डॉ. सौ. सोनल मुनोत यांनी यावेळी दिली. यावेळी महासंघाचे कैलास नहार, राजेंद्र जैन, दिलीप जैन, राज्यसभेचे खासदार श्री. लहर सिंह, सुनिल चोरडीया, जैन श्वेतांबर महासंघाचे अध्यक्ष कैलास नहार, संजय लुणावत, विनय यादव, दिपक जैन टिनू, ओसवाल ग्रुपच्या श्रीमती अरुणा ओसवाल, पीएम उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक संजय आणि रिअल मेकरचे संस्थापक विनय यादव, भाजपचे युवा राज्य कम मीडिया प्रभारी श्री दीपक जैन टिनू आदींसह अन्य पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करून प्रभूच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.