आशाताई बच्छाव
बँक खातेला आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय व्यक्तीला सव्वा चार लाख रुपयाने गंडवले, ओटीपी देताच खात्यातील पैसे लंपास….
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
सायबर सेल व प्रशासन वारंवार नागरिकांना सांगत असते मात्र या गोष्टीकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते आणि ते या घटनेला बळी पडतात. अशीच एक घटना खामगाव येथे घडली आहे बँक खाते ला आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका 55 वर्षीय व्यक्तीला तब्बल सव्वा चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सविस्तर वृत्त असे की अशोक कृष्णाजी इटे वय 55 रा बाळापुर फैल यांच्या मोबाईलवर 628950 5873 या क्रमांकावरून दोन मे रोजी संपर्क करण्यात आला बँक अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची बतावणी केली. वारंवार संपर्क साधून अशोक थिटे यांच्याकडून ओटीपी सह बँक खात्याची माहिती घेतली त्यानंतर सहा टप्प्यात त्याने येते यांच्या खात्यातून 4 लाख 25 हजार 167 रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा आरोप इथे यांनी तक्रारीत म्हटले आहे याप्रकरणी सायबर सेल बुलढाणा यांनी अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे