Home बुलढाणा पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगणमत, गावात खराब पाण्याचा पुरवठा करून ग्रामपंचायत...

पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगणमत, गावात खराब पाण्याचा पुरवठा करून ग्रामपंचायत नागरिकांचे करते समाधान नागरिकांचे आरोग्य धोक्यात….

102

आशाताई बच्छाव

1000371420.jpg

पाणीपुरवठा अधिकारी व ठेकेदार यांचे संगणमत, गावात खराब पाण्याचा पुरवठा करून ग्रामपंचायत नागरिकांचे करते समाधान नागरिकांचे आरोग्य धोक्यात….
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन हे गाव भलही विकासापासुन कोसो दुर आहे विकास भरगच्च नसेल तरी साचलेली गटारे, वर्षानु वर्षा पासून न झालेले रस्ते, गाव भर बोंबलत फिरणारी तरुण पिढी आणि गावाला पिडा लागून राहिलेला विषय म्हणजे पाणी, आता आमचं गाव मराठवाड्या सारखं टँकरवाडा झालं. इथे ग्रामपंचायत ने बांधलेल्या २ पाण्याच्या टाक्या त्यात एक गळकी असल्याची माहिती. आणि तिसरी चे बांधकाम सुरू असून ते 2-3 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता. अशा अनेक समस्यांना तोंड देत इथले नागरिक जगतात. ते सुद्धा आता मुक्के झालेत. त्यांना वाली उरला नाहीच.आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी कोण लावणार आम्हाला जगण्याचा अधिकार आहेत की नाही. आसे सुज्ञ नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत रस्ते, लाईन, पाणी या शिवाय गावकरी मागतात तरी काय? गावकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावकऱ्यांनी बोलायचे कोणाला, ग्रामपंचायत सदस्याना हे प्रश्न सांगितले तर ते नागरिकांना तुम्ही काय करायचे करा या उमरट भाषेत बोलतांना दिसतात. मग अशा वेळी ग्रामपंचायती मधील सर्व जणांनी राजीनामे का देत नाहीत. का तुम्ही तुमच्या नावाला लेबल लावून ठेवले आहे. की ग्रामपंचायत तुम्हालाच खायची आहे हा प्रश्न उपस्थित होतो आहे. नागरिकांची गैरसोय होणे केव्हा बंद होईल हा सर्व सामान्य नागरिकांनी ग्रामपंचायत ला विचारलेला प्रश्न आहे.
अडीज कोटीच्या जल जीवन मिशन चा ठेकेदार सरपंचाचे ऐकत नसल्याचे प्रतिपादन
सावखेड तेजन गावासाठी 2 कोटी 64 लाख 30 हजार 828 रुपयांची जल जीवन मिशन अंतर्गत काम सुर आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याचं दिसत. ग्रामसेवक व सरपंचाचे कॉल ठेकेदार घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं.असेल तर ठेकेदार काम करतो कसे या वर ग्रामपंचायत आवाज का उठवत नाही. की ते सुध्दा गूळ खावून गप्प बसलेत. गावामध्ये काही ठिकाणी नवीन पाईप टाकले तर गावातील काही भागांमध्ये जुन्याच पाईप लाईन वरून काम धकून काम मार्गी लावल्याचे दिसून आले.
दीड वर्ष उलटली तरी गावातील नवीन पाईप टाकणे झाले नाही एक महिन्यामध्ये नवीन पाईप टाकून देऊ असे आश्वासन ग्रामपंचायतने दिले होते, परंतु आज पर्यंत ग्रामपंचायत ने कोणते आश्वासन पूर्ण केले नाही. ग्रामपंचायत स्वतःचाच मनमानी कारभार या ठिकाणी करताना दिसत आहे . इथून पुढे कामे होतात का नाही होत याचाही प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे…

Previous articleदाभोळकर खून प्रकरणातील तपास यंत्रणेचा अनिस कडून निषेध जिल्हाधिकारी भंडारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Next articleशेतकरी लागले पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.