आशाताई बच्छाव
भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर, राजा कायम तर अशी असणार या वर्षीची भेंडवळची भविष्यवाणी….
युवा मराठा मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे घट मांडणी पद्धत म्हणजे शेतात खड्डा खड्ड्यात मातीचा घट घाटात पाणी आणि त्यावर कुरडया त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य अशी या घट मांडणीतून वर्षभराचा हंगाम पीक पाऊस अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडीचा अंदाज वर्तवला जातो बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की 350 वर्षापासून अक्षय तृतीयेला ही प्रथा जोपासली जाते या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास असतो तर सकाळी सूर्योदयाच्या वेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी
महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घटमांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे.याकडे संपूर्ण राज्याची लक्ष लागून असते यामध्ये शेतकऱ्यांसाठी भविष्यवाणी अशी की यंदा पावसाच्या परिस्थितीमध्ये पाऊस पहिल्या महिन्यामध्ये कमी असणार आहे दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण तर तिसऱ्या महिन्यामध्ये प्रचंड पाऊस असणार आहे चौथ्या महिन्यांमध्ये चांगला पाऊस असणार आहे. अतिवृष्टीचे भाकीत वर्तवण्यात आले आहे चौथ्या महिन्यामध्ये अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे पिकाबाबत केलेल्या भाकितामध्ये गहू जवारी तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाची पीक सांगण्यात आली आहे मात्र उत्पन्न चांगले असले तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार आहे असे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आले आहे यामध्ये राजकीय भविष्यवाणी अशी की राजकीय परिस्थितीवरही यंदा राज्यात निवडणुका चालू असल्यामुळे राजकीय भाकीत चांगल्या गेले नाही मात्र पानवेळा कायम आहे म्हणजेच पंतप्रधान कायम राहील असे म्हटल्या जाते भेंडवळच्या गट मांडणीचे भाकीत दरवर्षी जाहीर केले जातात






