
आशाताई बच्छाव
विद्युत डीपीतील ४०० लिटर ऑईल लंपास…
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर खामगाव महावितरण कंपनीच्या विद्युत डीपीतील ४०० लिटर ऑईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ मे रोजी उघडकीस आली आहे. याबाबत महावितरणच्या वतीने शिवाजीनगर पोस्टेला देण्यात आलेला तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सजनपूरी शिवारातील श्री कल्याणजी ऑइल इंडस्ट्रीज नजीक महावितरण ची विद्युत डीपी आहे. या वाल खालील वालची सेफ्टी कॅप सोडून अज्ञात चोरट्याने ४०० लिटर ऑइल किंमत चाळीस हजार रुपयांचे लंपास केले. अशी तक्रार महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन मधुकर बावनकर यांनी शिवाजीनगर पोस्टेला दिली आहे. त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम १३६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करीत आहे