Home बुलढाणा बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग,२१ वर्षीय युवक करत होता पाठलाग शेवटी बोराखेडी...

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग,२१ वर्षीय युवक करत होता पाठलाग शेवटी बोराखेडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल….

149

आशाताई बच्छाव

1000367828.jpg

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग,२१ वर्षीय युवक करत होता पाठलाग शेवटी बोराखेडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल….
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
मोताळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षीय मुलगी किराणा दुकानात सामान आणण्यासाठी जात असताना २१ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार बोरखेडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली सविस्तर वृत्त अशे की तालुक्यातील एका गावातील एका ३२ वर्षीय व्यक्तीने बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून,९ मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास १२ वर्षीय मुलगी किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी गेली होती, गावातीलच श्रीकृष्ण रवींद्र सोनोने या २१ वर्षीय युवकाने मुलीचा पाठलाग करीत तिला एका पडक्या घरात घेऊन गेला आणि त्याठिकाणी वाईट उद्देशाने मिठी मारून विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरडा केला असता, याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली,असे बोराखेडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलेले आहे याप्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण सोनोने या युवकाविरुद्ध पॉस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleइसरुळ परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस अंगावर वीजपडून बैल ठार…
Next articleनांदुरा शहरातील बुलडाणा रोडवर मॉर्निंग वॉक वरून परतणा-या महिलेस भरधाव टिप्परने चिरडले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.