आशाताई बच्छाव
वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकारी यांना निवेदन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- साकोली शहरातील पंचशील वार्डातील अजित बाबा समाधी साकोली या परिसरात यापूर्वी आपल्या कार्यालयामार्फत खेळणी साहित्य झुले लावण्यात आलेली होती. या साहित्यामुळे अजित बाबा समाधीलगतच्या पंचशील ध्वज आहे त्यावर चप्पल जूते ठेवणे , तंबाखू खाऊन थुंकणे, व रात्री झुल्यावर बसून दारू पिणे , झुल्यामुळे अशांतता पसरली होती परिसरातील लोकांना त्रास झालेला होता आणि मुलींबदल गंभीर प्रकार सुद्धा या ठिकाणी घडले त्यामुळे बहुजन हितकारणी कार्यकारणी सामाजिक संस्था या संस्थेद्वारे नगरपरिषदला हे झुले काढणे विषयी लेखी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून हे झुले काढण्यात आले होते .तसेच या परिसरात पंचशील बौद्ध विहार असून तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे स्थापन केलेले आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ बुद्ध पूजा पाठ वंदना या होत असते .वर्षभरात येणाऱ्या विविध महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येतात आणि या कार्यक्रमाला बहुसंख्य दलित समाजातील उपासक उपस्थित असतात. त्याचप्रमाणे दरवर्षी परिसरात अजित बाबाची समाधी जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात .सदर दोन्ही कार्यक्रमाला विविध सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात येते भोजनदान सुद्धा केले जाते त्यामुळे या परिसरात या सर्व कार्यक्रमासाठी व सामाजिक लग्न सोहळ्यासाठी जागा अपुरी पडते. तरी पण हे गांभीर्य लक्षात घेऊन या कार्यालयानुसार अजित बाबा चौक परिसरात मुलांचे खेळणे साहित्य काढण्यात आले पुन्हा दुसऱ्या पार्टीकडून त्याच ठिकाणी झुले लावण्यात यावी असा अट्टाहास करण्यात येत आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचा सामाजिक तेड निर्माण होणार नाही आणि दोन्ही समाजाचे लोक चांगल्या प्रकारे गुण्यागोंद्याने नांदावे यासाठी नगरपरिषद पुढाकार घेऊन प्रश्नाची सोडवण ूक करून घेण्याकरिता याकरिता वंचित बहुजन आघाडीने निवेदन दिलेले निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका महिला महासचिव शितल नागदेवे , महिला शहर अध्यक्ष स्वर्णमाला गजभिये, उत्तमा गडपायले,विद्या शहारे, शकुंतला घोडेस्वार, गीता वैद्य व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.






