Home अमरावती महाशिवपुराण कथा; कलश यात्री दरम्यान महिला दगावली. अटी शर्तीचा भंग आयोजकाविरुद्ध गुन्हे...

महाशिवपुराण कथा; कलश यात्री दरम्यान महिला दगावली. अटी शर्तीचा भंग आयोजकाविरुद्ध गुन्हे दाखल.

192

आशाताई बच्छाव

1000347899.jpg

महाशिवपुराण कथा; कलश यात्री दरम्यान महिला दगावली. अटी शर्तीचा भंग आयोजकाविरुद्ध गुन्हे दाखल.
__________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती ( परतवाडा).
पं. प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेच्या अनुषंगाने काढण्यात आलेला एक महिला कोसळली आणि मृत्युमुखी पडली. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ललिता सुभाष बाळापुरे वय ५८रा.कांडली असे मृत महिलेचे नाव आहे. महाशिवपुराण कथेनिमित्त सकाळी साडेसहा वाजता पासून कलश यात्रेला प्रारंभ झाला. या सहभागी झालेल्या ललितास भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात हरविले. दोन खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपट्यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुसरी महिला वाघा माता लगत गोवळ घेऊन रस्त्यावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. पण या महिलेचे नाव कळू शकले नाही. तापमान वाढल्याने कलश यात्रेत सहभागी महिलांना पायाखाली चटके लागत होते. कथास्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने तेथील कुलर पाण्याविना उष्ण हवा फेकत होते. कलश यात्रेकरता पोलिसांनी टिळक चौक ते वाघामाता अशी परवानगी दिली होती. सकाळी साडेसहाला सुरू झालेली कलश यात्रा नऊ वाजताच्या दरम्यान वाघामाता परिसरात पोहोचली. तिथे यात्रेचे विसर्जन अपेक्षित होते. पण काही अति उत्साही मंडळींनी प्रशासनाच्या अटी शर्ती पायदळी तुडवत हजारो महिला सह ही कलश यात्रा कथास्थळी नेली. सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झालेली आहे. कलश यात्रेचे नियोजन अंतर वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अंजनगाव रोडवरील वाहतूक जाम झाली. दरम्यानही काही महिला चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे परतवाडा पोलिसांनी ओम जयस्वाल, प्रकाश जयस्वाल, अमोल जयस्वाल, अजय मोरया विरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती परतवण्याचे ठाणेदार संदीप चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. व्यवस्था आणि महिलेच्या मृत्यू विषयी माहिती नाही. पुढील माहिती घेतली जाईल. कलश यात्रेदरम्यान अटी शर्तीचा भंग केल्यावरून चौघा विरुद्ध गुन्हे दाखल केले, कलश यात्रा पहाटच्या वेळी निघाली होती. मात्र गर्दीमुळे पुढे तिला उशीर झाला. खंडित वीज पुरवठा, अपूर्वे हॉटेल यामुळे पाणी व्यवस्थित व्यत्यय येत होता. पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गैरसोय होणार नाही असे प्रकाश जयस्वाल परतवाडा यांनी सांगितले.

Previous articleलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
Next articleआलेबेदर येथे पाच दिवसीय विद्यार्थी उन्हाळी शिबिराचे समारोपीय कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.