आशाताई बच्छाव
मतदान करताना चे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
निवडणुकीत २६ एप्रिल ला झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान स्वतःचे मतदान कोणाला केले, याचा फोटो व व्हिडिओ काही अति उत्साही मतदारांनी काढले व समाज माध्यमावर व्हायरल केले, त्यामध्ये मतदानाच्या गोपनीय चे भंग झाल्याने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक सौरभ कटियार यांनी सोमवारी पोलीस यंत्रणेला दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती, हा विकास आघाडी व प्रहार पक्षाच्या उमेदवारांमध्ये अंतिम टप्प्यात काट्याची लढत झाली. मतदानाच्या प्रक्रियेत मतदान करताना मत कोणत्या उमेदवाराला दिले, याबाबत उमेदवाराचे नाव, चिन्ह व मतदान यंत्र वरील क्रम दाखविणारे फोटो काढण्यात येऊन ते फेसबुक व व्हाट्सअप वरून व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार २६ 26 तारखेला जिल्ह्यात घडला आहे. लोकशाही प्रानिलेमध्ये मताचे गोपनीयता अन्यसाधारण महत्त्व आहे. या विषयाची कायदा देखील त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते. यासाठी पोलिसांची यंत्रणा काम करत किंबहुना निवडणूक दरम्यान अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा त्यावर लक्ष ठेवून कार्यवाही करण्यासाठी एक कक्ष देखील असतो. या कक्षाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे आहेत. त्यांना याविषयी विचारणा केली असता मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रात मोबाईल वापरास मनाई मतदान केंद्राचे १०० मीटर आत मोबाईल वापरास मनाई असताना येथे मतदान केंद्राच्या हात मोबाईल नेण्यात आला व कुण्या उमेदवाराला मतदान करीत आहे. याबाबत फोटो व व्हिडिओ काढण्यात आला व समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला .त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी व पोलीस काय करत होते, हा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे. तीन महिन्याची काय किंवा दंडाची तरतूद मतदानाची गोपनेता भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१चे कलम १२८ अन्वये तीन महिन्याची कैद किंवा दंड किंवा दंडाची तरदूद तसेच एकाच वेळी दोन्ही शिक्षा असे कायद्यात तरतूद असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे ते म्हणाले. मतदानाची गोपनीयता बंगाल झाल्याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नाही, परंतु याबाबतचा तपास करून असे फोटो समाज माध्यमावर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कार्य करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत असे सौरभ कटीयार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली.






