Home बुलढाणा टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

219

आशाताई बच्छाव

1000322930.jpg

टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी धाव घेत सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

ज्ञानेश्वर पाटील दांदळे/युवा मराठा न्यूज नेटवर्क,ब्युरो चीफ बुलढाणा-
संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथे दिनांक 27 एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास लग्नाच्या वरातीत नाचत असताना दोन गटात तणाव निर्माण झाल्याने दगडफेकीची घटना घडली. त्यामध्ये दोन्ही गटातील ७ ते ८ जण जखमी झाले त्यातील दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जळगाव जामोद पोलीस ठाण्यातील पोलिसांसह दंगाकाबू पथकाला पाचरण करण्यात आले सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे ८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. इतर आरोपींची धरपकड सुरू आहे याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधातील फिर्यादीवरून ४१ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Previous articleतुमसर पोलिसांनी एक किलो गांजा पकडला ;दोघांना अटक
Next articleलग्नात विनापरवानगी डीजे वाजवाल तर होणार कारवाई ; तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांचे आव्हान!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.