Home भंडारा तुमसर पोलिसांनी एक किलो गांजा पकडला ;दोघांना अटक

तुमसर पोलिसांनी एक किलो गांजा पकडला ;दोघांना अटक

140

आशाताई बच्छाव

1000322866.jpg

तुमसर पोलिसांनी एक किलो गांजा पकडला ;दोघांना अटक

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)-येथील हनुमान नगररातील गांधी सागर तलावाचे पारी जवळील वडाचे झाडाचे खाली एक किलो गांजा हस्तगत करण्यात आला.तुमसर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 16 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.संदिप मनिराम धुर्वे वय 44 वर्षे, रा. कोसम्बा पोस्ट सुकली ता. तिरोडा जि. बालाघाट मध्य प्रदेश,जितेश मुकेश कारेमोरे वय 39 वर्षे, रा. राजेंद्र नगर, तुमसर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रकरण अशा प्रकारे आहे कि,पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहीती नुसार तसेच या आरोपीतांची पंचासमक्ष झडती घेतलीअसता. त्यांचे ताब्यात असलेली बॅग मध्ये अवैध बिना परवाना गांजा (अंमली पदार्थ) वजन 938 ग्रॅम किंमती अंदाजे 16 हजार मिळुन आल्याने धर्मेद्र न्याहालचंद बोरकर वय 56 वर्षे रा.पोलीस स्टेशन तुमसर यांच्या फिर्यादी च्या तक्रारी नुसार आरोपी विरुद्ध कलम 8 (क), 20(ब), 2 (ब) एन.डी.पी.एस.अँक्ट या कलमान्वये तुमसर पोलिसात पोहवा. कुंदा लांजेवार यांनी गुन्हा दाखल केला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक हिवरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून अधिक तपास साहायक पोलीस निरीक्षक खोकले करीत आहेत.

Previous articleश्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव
Next articleटुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.