आशाताई बच्छाव
मतदान जनजागृती: अमरावती येथे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथ संचलन; १५ हजार ७०० नागरिकांची तिरंगा मारली.
_________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये’स्वीप’कार्यक्रमाचे अंमलबजावणी योग्यपणे केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर तिरंगा घेत चाल केली. मतदान का व किती गरजेचे आहे, याची मांडणी या रॅली द्वारे करण्यात आली. रॅलीमध्ये १७हजार७०० नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी सीइओ संतोष जोशी, पोलीस आयुक्त डॉ. नवीन चंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, स्वईपचए नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, राज्य कर्मचारी संघटनेचे डी .एस .पवार सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट आदी मान्यवर या रॅलीमध्ये प्रामुख्याने सहभागी झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा आयोगाच्या सूचना आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात १०० टक्के मतदान होईल, अशी खात्री या रॅली द्वारे निर्माण करण्यात आली. राजकमल चौक नेहरू मैदान येथून या मतदार जनजागृती तिरंगा महा रॅली चा प्रारंभ झाला. पुढे शहरातील प्रमुख रस्त्यांचे भ्रमण झाल्यानंतर इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. रॅलीत अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक वर्ग, आरोग्य सेविका, परिचारिका, महिला बचत गट, मनपा कर्मचारी, विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नये नेहरू मैदान येथून सदर महाराजाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडा दाखविला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक राष्ट्राचा सर्वात मोठा सण आहे आणि अभिमान या संकल्पनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ केला. जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारी अधिकाऱ्यांनी शपथ घेतली की ते आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करतील. मतदार जनजागृती रॅलीमध्ये पशु शल्य चिकित्सा डॉ. सचिन बोंद्रे, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, रोटरी क्लबचे राजेश मित्तल, मनपा शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह विविध संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मतदानाचे महत्त्व सांगून आणि आगामी लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान गाठण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासन जनजागृती कार्यक्रम भाग म्हणून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. यामध्ये स्वाक्षरी मोहीम, जनजागृती रॅली आणि मतदारांना मतदान करणे माझे कर्तव्य आहे असा संदेश देणारे सेल्फी पॉईंट बसविण्यात आले आहे.






