Home वाशिम अनसिंग येथे राजस्थानी महिलांची गणगौर उत्साहात संपन्न

अनसिंग येथे राजस्थानी महिलांची गणगौर उत्साहात संपन्न

256

आशाताई बच्छाव

1000288157.jpg

वाशीम , प्रतिनिधी निखिल धुत –राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने गणगौर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महिलांनी पारंपरिक गीत गायली. शोभायात्रेने अनसिंगकरांचे लक्ष वेधले होते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून हा मारवाडी समाजाचा सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजेच गणगौर उत्सव समजला जातो. यामध्ये गणगौर राजस्थानी पारंपरिक गीताचे आयोजन करून विविध प्रकारचे राजस्थानी गीतांचे गायन करत असतात. हा उत्सव १६ दिवस चालत असून, यामध्ये दररोज स्त्रिया सायंकाळी गणगौर मातेचे मंदिरामध्ये विधिवत पूजन करतात. या दिवसात स्त्रियांकरिता हे व्रत अधिक महत्त्वाचे आहे. गणगौरीच्या व्रतानिमित्त महिला पूजा करतात. त्यानंतर डोक्यावर कलश घेऊन विहिर वर जातात. घरी आल्यानंतर शिवपार्वतीचे वेश तयार करून शोधा प्रतिष्ठापना केली जाते. शिवपार्वतींना सुंदर वस्त्रे अर्पण करून या प्रसंगी पूजा केली जाते. गणगौर गीताचे अनेक महत्त्व असून, हा उत्सव राजस्थान राज्यामध्ये अधिक पसंतीचा असून, इतर राज्यांमध्येपण गणगौर उत्सव साजरा करण्यात येतो. महिलांमध्ये अधिक आनंद व उत्साह पाहायला मिळते. अनसिंग येथे राजस्थानी गणगौर उत्सवाची सांगता शांततेत करण्यात आली. या उत्सवामध्ये राजस्थानी महिला सहभागी होत्या.

Previous articleमुक्रमाबाद येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे दोन विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
Next articleअंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर परिसरात तरुणाचा झाला खून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.