Home जालना स्वतःच्या तीन लेकरांना विहिरीत टाकून त्यांचे जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपी बापास केले...

स्वतःच्या तीन लेकरांना विहिरीत टाकून त्यांचे जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपी बापास केले जेरबंद.

172

आशाताई बच्छाव

1000287823.jpg

स्वतःच्या तीन लेकरांना विहिरीत टाकून त्यांचे जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपी बापास केले जेरबंद.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 15/04/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, पोलीस ठाणे अंबड हद्दीमध्ये मौजे डोमेगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथील इसम नामे विलास साळुंखे यांचे मालकीच्या विहिरीत संतोष धोंडीराम ताकवाले वय 30 वर्षे राहणार कात्राबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने त्याचे स्वतःचे दोन मुली व मुलगा यांना निर्दयीपणे विहिरीमध्ये फेकून निर्दयीपणे त्यांचे जीव घेतले म्हणून पोलीस ठाणे अंबड येथे गु.र.नं.196/2024 कलम -302,201 भा.द.वि. कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने सदर आरोपीचा शोध घेणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पोलीस ठाणे अंबड येथील आरोपी संतोष धोंडीराम ताकवाले वय 30 वर्षे राहणार कात्राबाद तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर याचा शोध घेण्याबाबत एक विशेष पथक नेमले सदर आरोपीचा शोध घेत असता पथकातील अंमलदार यांना माहिती मिळाली की, संतोष ताकवाले हा आरोपी छत्रपती संभाजी नगर शहरात बाबा पेट्रोलपंपाजवळील ट्रॅव्हल्स पार्किंग एरियामध्ये उभा असल्याची माहिती मिळाल्याने नमूद आरोपीस सदर ठिकाणी जाऊन ताब्यात घेऊन पोलीस ठाणे अंबड येथे हजर केले आहे.
सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ व सोबत स्थागुशाचे अंमलदार रमेश राठोड, देविदास भोजने, अक्रुर धांडगे यांनी केली आहे.

Previous articleमाहोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा 
Next articleभक्ती महामार्ग कृती समिती सदस्यांनी घेतली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.