Home जालना माहोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा 

माहोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा 

217

आशाताई बच्छाव

1000287817.jpg

माहोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा
सर्कल प्रतिनीधी माहोरा -मुरलीधर डहाके
दिनांक 15/04/2024.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,माहोरा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रील रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती . मिरवणुकीत सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मिरवणुकीत मोठा भिमसागर उसळला होता. मिरवणुकीमध्ये माहोरा तसेच परिसरातील सर्व समाजातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माहोरा परीसर जय भीम च्या घोषणांनी दणाणून गेला होता. मिरवणूकीची सुरूवात सम्राट अशोक बौध्द विहार माहोरा व भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून सुरुवात करण्यात आली. तेथून ते बस स्थानक परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये आल्या नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुढे नेण्यात आली. मिरवणुकीमध्ये महिलांचा सुध्दा खूप मोठ्या प्रमाणत सहभाग होता. तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जाफराबाद पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब आणि बीट जमादार व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत पार पडली.

Previous articleरेणूका माता संस्थान माहोरा, येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Next articleस्वतःच्या तीन लेकरांना विहिरीत टाकून त्यांचे जीव घेणाऱ्या निर्दयी आरोपी बापास केले जेरबंद.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.