Home बुलढाणा खुनाच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून बेपत्ता आरोपी पोलीसांनी केला जेरबंद…

खुनाच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून बेपत्ता आरोपी पोलीसांनी केला जेरबंद…

135

आशाताई बच्छाव

1000279147.jpg

खुनाच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून बेपत्ता आरोपी पोलीसांनी केला जेरबंद…

सिंदखेडराजा/चिखली (बुलढाणा युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर) पोलीस स्टेशन किनगाव राजा अंतर्गत वर्दडी येथील दाखल कलम 302 भादंवी खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे विद्याधर शामसुंदर सोनकांबळे हा गुन्हा घडल्यापासुन गावातुन पोलीसांना चकमा देऊन सहा वर्षापासुन फरार झाला होता.

त्याला जेरबंद करण्यासाठी उपविपोअ दे राजा व किनगाव राजा यांच्या संयुक्त कारवाई मा. श्री. सुनिल कडासने पोलीस अधिक्षक साहेब बुलडाणा, मा. श्री. बी बी महामुनी अपर पोलीस अधिक्षक साहेब, बुलडाणा यांचे आदेशाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन किनगाव राजा ठाणेदार विनोद नरवाडे यांचे नेतृत्वात आरोपी शोध बाबत पोलीस स्टेशनला पथक तयार करण्यात आले. फरार आरोपी गावात येत असल्याबाबत गोपनिय माहीती मिळताच गोपनिय माहीतीच्या आधारे पथकातील पोलीस अंमलदार पोहेकॉ विलास काकड उपविपोअ कार्यालय दे राजा नापोकों विष्णु मुंढे, पोकों शिवाजी बारगजे, पोकों मिलींद सोनपसारे, गणेश वारकरी चालक पोकों अतिष सवडे यांनी गुन्ह्यातील सहा वर्षापासुन फरार आरोपी विद्याधर शामसुंदर सोनकांबळे वय 31 वर्ष रा. वदंडी बु// यास दिनांक 11/04/2024 रोजी 01/30 वा गुरूवार ला वर्दडी बु गावातील बसटँडवर नाकाबंदी करून ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली.

Previous articleमोताळा तालुक्यात गारपीटीचा तडाखा
Next articleआदिवासी बांधवांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी काँग्रेस नेहमीच तत्पर- श्री. वडेट्टीवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.