Home अमरावती भाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!

भाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!

125

आशाताई बच्छाव

1000275868.jpg

भाजपचा पहिला तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर!
मत पत्रिका तयार. ७(अ)लाख निवडणूक आयोगाची मान्यता.
_____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
उमेदवारी अर्जाचा टप्पा आटोपल्यानंतर आता निवडणूक यंत्रणा मतदानाच्या प्रक्रियेच्या तयारीला लागली आहे. यामध्ये उमेदवारांचा मराठी वर्णमालेनुसार क्रम निश्चित करण्यात येऊन आयोगाची मान्यता घेण्यात आली. यामध्ये भाजपचा उमेदवार पहिल्या, काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या, तर बसपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी अर्जाची माघार झाल्यानंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करण्यात आली व लगेच रिंगणातील उमेदवारांना निवडणुकीचे चिन्हाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मतपत्रिकेसाठी नियमानुसार क्रम निश्चित करण्यात येऊन नमुना ७(अ) निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला. व त्यांच्या मान्यतेनंतर नमुना ७(अ) प्रसिद्ध करण्यात आला. मतपत्रिका व ईव्हीएम वर उमेदवारांचा हाच क्रमांक राहणार आहे. शिवाय मंगळवारी दुपारी ३ पूर्वी या मतपत्रिका अमरावती लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या २६८९ सेवा दलातील मतदारांच्या अभिलेखा कार्यालयात”इ टी पी बी एस”या यंत्रणेद्वारे पाठविण्यात आलेले आहेत. लोकसभेसाठी यावेळी ३७ उमेदवार रिंगणात आहेत व आयोगाने मान्यता दिलेल्या क्रमांक नुसारच या मतपत्रिका टपाली मतदानासाठी व ईव्हीएम वर राहणार आहेत. शिवाय घरून मतदान करणारे ८५ वर्षावरील जेष्ठ मतदार व दिव्यांग बांधव यांच्या टपाली मतपत्रिकेतही हाच क्रम राहणार आहे. राष्ट्रीय पक्ष पहिल्यांदा, नंतर प्रादेशिक पक्ष. नमुना ७(अ) मध्ये सुरुवातीला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे तीन उमेदवारांचा समावेश आहे, तर त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या ११ उमेदवारांचा समावेश आहे. व त्यानंतर २३ अपक्षांची वर्णी लागली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार क्रम तयार करताना मराठी वर्णमालेचा वापर करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. पुढील मतपत्रिका क्रम असे आहे. मतपत्रिकेत राष्ट्रीय पक्ष भाजपाचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर, काँग्रेसचा उमेदवार दुसरा क्रमांक वर व बीएसपी चा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा क्रम आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक), पाचवा रिपब्लिकन सेना, सहावा अ.भा. परिवार पार्टी,सातवा राष्ट्रीय ओला पार्टी,पार्टी, आठवा न.भा. एकता पार्टी, नवा प्रहार पार्टी, दाहवा जनहित पार्टी, ११वा ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची उमेदवार, व त्यानंतर २३ पक्षांचा समावेश आहे.

Previous articleअमरावती जिल्ह्यात डोळ्यात मिरची पूड टाकून लूटमार करणारी टोळी जरा बंद; पाच गुन्ह्याची कबुली.
Next articleविदर्भात वादळ सह अवकाळी व गारपिटीचा फटका, अमरावती विभागीय आयुक्त द्वारे पंचनामाचे आदेश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.