Home अमरावती एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकाचा वॉच, वस्तू व सेवा कर विभाग लागला...

एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकाचा वॉच, वस्तू व सेवा कर विभाग लागला कामाला ४०अधिकारी१०० कर्मचाऱ्याद्वारे वाहन तपासणी.

99

आशाताई बच्छाव

1000271534.jpg

एमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकाचा वॉच, वस्तू व सेवा कर विभाग लागला कामाला ४०अधिकारी१०० कर्मचाऱ्याद्वारे वाहन तपासणी.
____________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्हा सिमेंसह व आंतरराज्य सीमेवरील मध्य प्रदेश व तेलंगाना बॉर्डरच्या नाक्यावर वस्तू व सेवा कर विभागाद्वारे वाहनाची तपासणी सुरू आहे. या विभागाचे४० अधिकारी व १०० कर्मचारी यांच्या पथकाद्वारे पाचवी जिल्ह्यातील चेक पोस्टवर वॉच आहे. मालाची वाहतूक करताना वस्तू व सेवा कर कायद्याच्या कलम ६८ व नियम १३८ आवश्यक असणारे योग्य टॅक्स इन्वहाॅइस व ई-वे बिल आहे किंवा नाही याची तपासणी विभागाच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. मालाचे वजन, किंमत, संख्या, टॅक्स इन्व्हाईस व गाडीतील माल या तफावत किंवा त्रुटी आढळल्यास नियम १२९ नुसार कराच्या २०० टक्क्यापर्यंत दंड लावण्याची कठोर कारवाई विभागाचे अधिकारी करीत आहेत. विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये ई-वे बिल तपासणी मोहीम या विभागाचे राज्य कर आयुक्त पोखरकर यांच्या मार्गदर्शनास सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात नांदगाव टोल नाका, खरपी नाका, वरुड-रवाळा (एमपी बॉर्डर) पिंपळखुटा-केळापूर महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर पक्के तैनात असून वाहनाची कसून तपासणी होत आहे. या पथकाद्वारे तपासणी होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीला समजले. अमरावती: मुंबईकडे जाणारा जुना राष्ट्रीय महामार्ग, यवतमाळ: नागपूर-नांदेड महामार्ग, अकोला: छत्रपती संभाजीनगर-जळगाव खान्देश-नागपूर महामार्ग, वाशिम: जालना-वाशिम राज्य महामार्ग.

Previous articleगुढीपाडवा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा
Next articleरामकृष्ण कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.