Home बीड परळी शहरातील मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा- सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये...

परळी शहरातील मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा- सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांची मागणी

109

आशाताई बच्छाव

1000271488.jpg

परळी शहरातील मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा- सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांची मागणी

 

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

 

बीड/परळी दि: ०८
शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी मोकाट जनावरे व गाढवांचा कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या जनावरामुळे वाहतुकीस व्यत्यय येत आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी बसलेली जनावरे कितीही हॉर्न वाजवला तरी रस्त्याच्या बाजूला सरकत नसल्यामुळे अनेकदा या मोकाट जनावरामुळे रस्त्यावरील वाहनाचे अपघात होत आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच परंतु नागरिकांना जीवित हानी होण्याची दाट शक्यता असते. दरम्यान परळी नगर परिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.मनोज संकाये यांनी केली आहे. परळी शहरातील मोंढा मार्केट, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राणी लक्ष्मीबाई टावर चौक, गणेशपार चौक, प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर सारख्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरांनी मुक्काम मांडल्याचे दिसत असून यांच्यामुळे सर्वच लहान मोठ्या वाहन धारकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच मार्केट कमिटीच्या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढू लागली आहेत. तरी नगर पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा व मोकाट गाढवांचा, कुत्र्यांचा बंदोबस्त करून त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त करावे अशी मागणी अ‍ॅड.मनोज संकाये यांच्यासह असंख्य नागरिक, समाज सुधारक, पुढारी, कार्यकर्ते यांनी केली आहे.

Previous articleलग्नाचे आमिष दाखवून २० वर्षीय मुलीवर बलात्कार!
Next articleवीज दरवाढ मागे घेण्याची चाळीसगाव कार्यकारी अभियंता यांना रयत सेनेची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.