आशाताई बच्छाव
११ एप्रिल पासून कसबे सुकेने येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित अखंड हरिनाम सप्ताह—
दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे
कसबेसुकेने तालुका निफाड येथील श्रीराम मंदिर प्रांगणावर 11 एप्रिल 18 एप्रिल पर्यंत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह कालावधीत दररोज सायंकाळी साडेचार ते साडेसहा यावेळेत ख्यातनाम रामकथा प्रवक्ते ह,भ,प, भास्कर महाराज रसाळ रामकथेचे निरूपण करणार आहेत.
सप्ताह कालावधीत पंडित महाराज कोल्हे,शांताराम महाराज गांगुर्डे आळंदी, ज्ञानेश्वर महाराज कदम,मोठे माऊली,आळंदी,तुकाराम महाराज मुळीक,आळंदी,जगदीश महाराज जोशी,त्र्यंबकेश्वर,माधव महाराज राठी,नाशिक,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,आळंदी,माधव महाराज घुले,इगतपुरी,वैभव महाराज राक्षे,देहू यांची कीर्तने होणार आहेत,सप्ताह कालावधीत सकाळी 8 ते 11 या वेळेत संत निवृत्तीनाथ महाराज गाथा पारायण होणार आहे, भाविकांनी श्रीरामकथा,कीर्तन,पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन हरिनाम सप्ताह कमिटी, ग्रामस्थ व भजनी मंडळाने केले आहे






