Home नाशिक भरवस येथील श्री जगद्गुरु तुकोबाराय कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

भरवस येथील श्री जगद्गुरु तुकोबाराय कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

42
0

आशाताई बच्छाव

1000266396.jpg

भरवस येथील श्री जगद्गुरु तुकोबाराय कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने परिसरासह जिल्हाभरातील येणाऱ्या शेतकऱ्यांना व भाविकांना आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी, शेतीतील उत्पन्न कशा पद्धतीने वाढवावे त्याचबरोबर हवामानानुसार शेती पद्धती, पाण्याचे योग्य नियोजन या सर्व गोष्टींचा फायदा होण्याच्या दृष्टीने अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सदर प्रदर्शनामध्ये नवनवीन अवजारे, नवीन बी बियाणे, खते, औषधे, मशिनरी, ट्रॅक्टर्स, ठिबक सिंचन, नर्सरी, रोपवाटिका, सोलर उत्पादने त्याचबरोबर गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, बचत गट साहित्य, खाद्यपदार्थ असे जवळपास 200 च्या आसपास स्टॉल असून सदर प्रदर्शन हे 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2024 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पर्यंत शेतकऱ्यांसाठी विनामूल्य चालू असून शेतकऱ्यांसह महिलांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असा आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

दररोज 10 हजार पेक्षाही जास्त शेतकरी प्रदर्शनात भेट देत असून आत्तापर्यंत 50 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा आनंद घेतला शेवटच्या तीन दिवसात हा आकडा एक लाखापेक्षाही जास्त होईल असा अंदाज आहे.

Previous article११ एप्रिल पासून कसबे सुकेने येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित अखंड हरिनाम सप्ताह—
Next articleनांदेड लोकसभेसाठी 66 पैकी एका पात्र उमेदवाराची माघार ;
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here