आशाताई बच्छाव
कुणालाही गावबंदी करता येणार नाही; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार : जिल्हाधिकारी
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि: ०६ आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नेत्याला कोणालाही व कुठेही गावबंदी करता येणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी दिला आहे . न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही गावाला गावबंदी करता येणार नाही. जिल्ह्यात कुठलेही गाव बंदीचे फलक लावता येणार नाही. अशा प्रकारचे फलक असल्यास ते काढून घ्यावेत. न्यायालयाची अवेहलना केली असल्यास कायदेशीर कारवाई करावी. असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी पोलिसांना दिले आहेत. गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.






