Home नाशिक धांद्रीच्या राममंदिरात धाडसी चोरी,नागरिकांत खळबळ (दावल पगारे विशेष प्रतिनिधी)

धांद्रीच्या राममंदिरात धाडसी चोरी,नागरिकांत खळबळ (दावल पगारे विशेष प्रतिनिधी)

752

आशाताई बच्छाव

IMG_20240403_113328.jpg

धांद्रीच्या राममंदिरात धाडसी चोरी,नागरिकांत खळबळ
(दावल पगारे विशेष प्रतिनिधी)
लखमापूर – नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धांद्री येथील रामम़ंदिरात धाडसी चोरी झाली असून, त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धांद्री ता.बागलाण येथे अवघ्या दोन तीन महिन्यांपूर्वीच राममंदिराचे पुर्ननिर्माणाचे काम पूर्ण झाले असून,काल मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरात टाकलेल्या धाडसी घरफोडीत मंदिरातील ऐवज लुटून नेला.प्रभू रामचंद्र व सीतामाईच्या अंगावर परिधान केलेले किंमती दागिनेही चोरट्यांनी चोरून नेल्याने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या घटनेची फिर्याद सटाणा पोलिसांना आज सकाळी देण्यात आली असून,हे वृत्त लिहीपर्यत पोलिस घटनास्थळी पोहोचले नव्हते.तर घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

Previous articleपरळीच्या शिरतेचात मानाचा तुरा धनराज आदोडे यांची सहाय्यक संशोधन अधिकारी पदी निवड
Next articleबीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला धुळेला एसीबीने घातल्या बेड्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.